30.8 C
Latur
Saturday, May 3, 2025
Homeमहाराष्ट्र६० वर्षीय वृध्दाची फसवणूक;मुलीच्या व्हीडीओ कॉलने १४ लाखांना गंडविले

६० वर्षीय वृध्दाची फसवणूक;मुलीच्या व्हीडीओ कॉलने १४ लाखांना गंडविले

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटल अरेस्टद्वारे फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅपवरील काही सेकंदांच्या व्हीडीओ कॉलमुळे तब्बल १४ लाख रुपयांचा फटका बसला. आंघोळ करताना आलेला न्यूड व्हीडीओ कॉल आणि त्यानंतर तो व्हायरल करण्याची धमकी देणा-या तोतया पोलिसांनी या वृद्धाला लुटले.

बनावट पोलिसांनी जेलची भीती दाखवत पैसे उकळले. या प्रकरणी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंगसह दोन अज्ञात व्यक्तींवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डिजिटल युगातील या सायबर गुन्ह्याने सावधानतेचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला आंघोळ करताना व्हॉट्सअ‍ॅप व्हीडीओ कॉल रिसिव्ह करणे तब्बल १४ लाख रुपयांत पडले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या काही सेकंदांच्या व्हीडीओ कॉलने ६० वर्षीय सेवानिवृत्त खासगी नोकरदाराला १४ लाखांचा गंडा बसला. न्यूड व्हीडीओ कॉल करत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

त्यानंतर तोतया पोलिसांनी फोन करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकाने आरोपीने सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यांवर ही रक्कम टाकली. या प्रकरणी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंग व दोन अज्ञात व्यक्तींवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR