20.9 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeउद्योग६५ हजारांपेक्षा अधिक टॉवर्स; ‘बीएसएनएल’ची ४-जी सुरू

६५ हजारांपेक्षा अधिक टॉवर्स; ‘बीएसएनएल’ची ४-जी सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या ४-जी नेटवर्कच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. यावर्षी बीएसएनएल आपली ४-जी सेवा पूर्णपणे लाँच करणार आहे, त्यानंतर युजर्सना चांगला अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
‘बीएसएनएल’ने आपल्या ५-जी नेटवर्कवर काम सुरू केले आहे. ४-जी नेटवर्कपाठोपाठ बीएसएनएल युजर्सना लवकरच ५-जी सेवेचाही लाभ मिळू लागणार आहे. ‘बीएसएनएल’चे ६५ हजारांहून अधिक ४-जी टॉवर्स लाईव्ह करण्यात आले आहेत. त्यामुळे बीएसएनएल युजर्सना आता चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
‘बीएसएनएल’ने आपल्या ‘एक्स’ हँडलवर पोस्ट करून ६५,००० हून अधिक ४-जी टॉवर्स लाइव्ह करण्याची घोषणा केली आहे. ‘बीएसएनएल’ने युझर्सना आता चांगली कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्क कव्हरेज मिळणार असल्याचे म्हटले. दरम्यान, या वर्षात बीएसएनएल आपली ४-जी सेवा देशभरात व्यावसायिकरित्या सुरू करणार आहे. ‘बीएसएनएल’ देखील आपल्या ५-जी नेटवर्कची चाचणी घेत आहे. यासाठी टाटासोबत भागीदारी केली आहे.
दरम्यान, ‘बीएसएनएल’ आपल्या ३-जी नेटवर्कला फेज आऊट करत आहे, जेणेकरून ४-जी आणि ५-जी टॉवर स्थापित केले जाऊ शकतात. ‘बीएसएनएल’ने बिहार टेलिकॉम सेवेतील थ्रीजी सेवा टप्प्याटप्प्याने बंद केली आहे. युजर्संना आता थ्रीजीऐवजी ४-जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR