24.3 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeलातूर६८४ सायलेन्सरवर फिरवला रोलर

६८४ सायलेन्सरवर फिरवला रोलर

लातूर : प्रतिनिधी
लातूर पोलिसांनी गेल्या वर्षभरात ३४ लाखांच्या ६८४ दुचाकी सायलेन्सवर रोलर फिरवून सायलेन्सर नष्ट केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकीस्वारांचा ‘फटाका’ बंद झाला आहे.   लातूर शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणा-या वाहनधारकांवर लातूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणा-या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात  वाहतुक नियंत्रण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली
आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत  सन २०२४ मध्ये  मॉडिफाईड सायलेन्सचे २९० केसेस करुन २,८१,५०० रुपये दंड आकारण्यात आले तर कर्णकर्कश हॉर्नवर ५४४  केसेस करुन ३,५२,५०० रुपये दंड आकारण्यात आले आहे. लातुरात वर्षभरात तीन मोहीम राबवून एकूण ६८४ वाहनांचे अंदाजे ३४ लाख रुपयाचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या ३४ लाखांच्या फटाका सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत ते नष्ट केले. पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हौशी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत.
याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलिस ठाण्यांच्या  पोलिस अमलदारा कडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर वर्षभरात लातूर पोलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करुन फटाका (मॉडिफाय) सायलेन्सर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेन्सरबरोबरच त्या-त्या वाहनधारकांना दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR