36.9 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeलातूर६ मोठ्या व ४० छोट्या नाल्यांची स्वच्छता

६ मोठ्या व ४० छोट्या नाल्यांची स्वच्छता

लातूर : प्रतिनिधी
पावसाळ्याच्या तोंडावर लातूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून मान्सूनपूर्व नाले सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत ६ मोठे व ४० छोट्या नाल्यांची स्वच्छता करण्यात आली असून दि. ७ जून पूर्वी स्वच्छतेचे काम पूर्ण केले जाणार आहे. लातूर शहरात एकूण ११५ नाले आहेत. त्यात ५० मोठ्या व ६५ छोट्या नाल्यांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दि. २ मे रोजी बैठक घेवून ७ जुनपूर्वी नालेसफाई करण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार दि.१० मे पासूनच या नाल्यांची स्वच्छता करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.
त्यासाठी २ मोठे जेसीबी ६ छोटे जेसीबी, ४  टिप्पर व १० ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे.गतवर्षी पालिकेने नालेसफाई करून २५० टन घनकचरा संकलित केला होता. यंदाही त्याच पद्धतीने काम सुरु आहे. शहरातील इस्लामपुरा, गंगाधाम, रिंग रोड, हलकुडेनगर, दीपज्योतीनगर, नांदगाव वेस, साईबाबानगर, संविधान चौक, कव्हा रोड, कातपुर रोड, नांदेड रोड, सारोळा रोड, बरकतनगर, काझी मोहल्ला, साईधाम रोड, गोपाळनगर, शंकरपूरम, दयानंद महाविद्यालय, प्रकाशनगर या भागातील नाल्यांची सफाई जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली आहे.उर्वरित सर्व लहान मोठ्या नाल्यांची स्वच्छता दि. ७ जून पूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त शुभम क्यातमवार यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR