रेणापुर : प्रतिनिधी
गणेश मंडळाला लागणारा परवाना काढण्यासाठी पूर्वी अनेक आडचणी येत असताना शासनाने ऑनलाईन परवाना काढण्याची सोय केल्याने तालुक्यात परवाना घेणा-या गणेश मंडळाची संख्या वाढली आहे. शनिवार दि. ७ रोजी पर्यंत रेणापुर पोलीस ठाण्याकडे जवळपास ७१ गणेश मंडळाने व एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत १२ गावात ऑनलाईन परवाना घेऊनच रेणापूर शहरासह तालुक्यात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढून श्री ची शांततेत दि . ७ सप्टेबर रोजी स्थापन केली.
रेणापूर शहरातील महात्मा बसवेश्वर गणेश मंडळ, सिध्दीविनायक गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ, छत्रपती संभाजी गणेश मंडळ, प्रभात गणेश मंडळ, रेणापूरचा महाराजा गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ, शिवराणा गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गणेश मंडळ, छत्रपती राजे गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, मोरे नगर गणेश मंडळ, श्री. एस एन आर गणेश मंडळ, गौवरी गणेश मंडळ यासह बालगणेश मंडळानी पारंपारीक वाद्याच्या व ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत ‘श्री’ ची स्थापना केली.
तर रामवाडी, सेवादास नगर, आरजखेडा, ईटी, आंदलगाव, भोकरंबा, कुंभारी, टाकळगाव घनसरगाव, बावची, कुंभारवाडी या गावांनी एक गाव एक गणपती या संकल्पनेचा अवलंब करीत श्री स्थापना केली तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, २५ पोलीस कर्मचारी व ३५ होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदिप काकडे व गोपीनीय शाखेचे किरण मडोळे यांनी दिली आहे.