26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय८ राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला मंजुरी

८ राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉरला मंजुरी

नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दिशेने एक मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने एकूण ५० हजार कोटींच्या ९३६ कि.मी. लांबीच्या ८ राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या ९३६ कि.मी. लांबीच्या ८ महत्त्वपूर्ण राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमुळे देशभरातील लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे, गर्दी कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यास मदत होणार आहे, असेही वैष्णव म्हणाले. यामध्ये ६ लेन आग्रा-ग्वाल्हेर नॅशनल हायस्पीड कॉरिडॉर, ४ लेन खारापूर-मारेग्राम राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर, ६ लेन थरड-दिशा-मेहसाना-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर, ४ लेन अयोध्या रिंग रोड, ४ लेन पाथळगाव आणि गुमला रायपूर-रांची नॅशनल हायस्पीड कॉरिडॉर, ६ लेन कानपूर रिंग रोड, ४ लेन उत्तर गुवाहाटी बायपास, पुण्याजवळ ८ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉर या प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होईल. तसेच अर्थव्यवस्थेचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR