30.5 C
Latur
Saturday, May 31, 2025
Homeलातूर९६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

९६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात १६ जून पासून नविन शैक्षणीक वर्षाला सुरूवात होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बरोबरच गणवेश देण्यासाठी शासनाकडून जिल्हा स्तरावर ९६ हजार ६५७ विद्यार्थ्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून तो लवकरच तालुका व शाळास्तरावर वितरीत होणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तका बरोबर गणवेश मिळेल अशी अशा आहे.
गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश धोरण शिक्षण विभागाने सुरू केले आहे.  लातूर जिल्हयात जिल्हा परिषदेच्या १२७३ शाळा व मनपाच्या १६ शाळा, १८ पीएमश्री शाळा मधील इयत्ता १ ली ते ८ वी सरसगट ९६ हजार ६५७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शाळा व्यवस्थान समितीच्याकडून दिला जाणार आहे. तर गेल्यावर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश शिवून पुरवण्यात आले होते. या पुन्हा शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश देण्याचे सुचित करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR