हैदराबाद : वृत्तसंस्था
मद्य प्रेमींसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. आता फक्त ९९ रुपयांमध्ये दारुचा कोणताही ब्रँड मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. हे धोरण १२ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. याशिवाय राज्यात ३७३६ दारुची दुकानेही उघडली जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू सरकारने ९९ रुपयांमध्ये दारु देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारची ५५०० कोटी रुपयांची कमाई होणार आहे.
चंद्राबाबू नायडू सरकारने राज्यातील दारूची किंमत ९९ रुपये निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक कंपन्यांना स्वस्त ब्रँडेड दारू बनवण्याची संधीही मिळेल, असा राज्य सरकारचा दावा आहे.
१२ ऑक्टोबरपासून धोरण लागू : आपल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणातून राज्य सुमारे ५५०० कोटी रुपयांचा महसूल मिळवू शकेल. हे धोरण १२ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. याशिवाय राज्यात ३७३६ दारुची दुकानेही उघडली जाणार आहेत. राज्यात ब्रँडेड मद्य ९९ रुपयांना किंवा त्यापेक्षा कमी दराने उपलब्ध होणार आहे.
उत्पादन शुल्क धोरणाची अधिसूचना जारी करताना, राज्य सरकारने दावा केला की, ते हरियाणासारख्या राज्यांपासून प्रेरणा घेऊन तयार केले गेले आहे. आता राज्यात दारुची दुकाने खाजगी झाली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात दारूची विक्री कमी होत आहे. आता त्यात वाढ होऊन राज्य देशातील टॉप ३ बाजारपेठांमध्ये सामील होऊ शकेल, अशी सरकारला आशा आहे.
धोरण दोन वर्षांसाठी : नवीन उत्पादन शुल्क धोरण सध्या दोन वर्षांसाठी लागू करण्यात आले आहे. यामुळं कंपन्यांमध्ये स्थिरता येईल आणि किरकोळ विक्रेतेही मोठ्या संख्येने त्यात सामील होऊ शकतील.