23.9 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeपरभणीआयशर अपघातात १ ठार, १ गंभीर जखमी

आयशर अपघातात १ ठार, १ गंभीर जखमी

पूर्णा : तालूक्यातील पूर्णा ते ताडकळस मुख्य रोडवर असलेल्या कानडखेड शिवारातील बॉम्बे पूलाच्या चढावर चालकाचा ताबा सुटल्याने पुलाचे लोखंडी कठडे तोडून पूर्णेकडून ताडकळसकडे गट्टू भरुन जाणारा आयशर (क्रमांक एम एच १४ डी एम ९३५२) दि. १७ डिसेंबर रोजी रात्री ९च्या दरम्यान दरीत कोसळला. यात आयशर चालक रंगनाथ श्रीपती रोडगे, रा. महागाव ता. पूर्णा (वय ३५) यास जबर मार लागल्याने जागीच ठार झाला. या अपघातात क्लिनर भगवान वाघमारे रा.अजदापूर ता. पूर्णा हा गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारार्थ नांदेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कानडखेड शिवारातील हा उतार चढाचा वळण रस्ता धोकादायक मार्ग असून येथे नेहमीच अपघात होतात. या पूलावरील रस्त्याचे कठडे तोडून मोटार अपघात होत आहेत. सदर रस्ता हा वळणाचा असल्याने चढावरुन उताराला आलेले वाहन पुढून येणा-या वाहनाला दीसत नसल्याने येथे आजवर बरेच अपघात होवुन प्रवाशी ठार झालेत. दरम्यान आयशर दरीत कोसळून घडलेल्या घटनेची बातमी लिहेपर्यंत पूर्णा पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. या घटनेमुळे महागावात एकच शोककळा पसरली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR