ताडकळस : ताडकळस ते पुर्णा रोडवर शुक्रवार, दि.२४ सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ट्रक व आयशर यांची समोरासमोर धडक झाली. या एकजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली. या अपघाताची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी मदतीसाठी मोठी गर्दी केली होती.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, ताडकळस कडून पुर्णाकडे ट्रक जात होता. तर एम.एच.२२ ए.एन. ४५४० क्रमांकाचा आयशर हा पुर्णाकडून ताडकळसकडे येत असताना ताडकळसपासून ३ किलोमीटर अंतरावर पिंगळगड नदीजवळ समोरासमोर दोन्ही वाहनांची जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झाला.
या अपघाताची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ३ गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.