नांदेड : प्रतिनिधी
बनावट पानपट्टीत विक्रीसाठी लपवून ठेवलेला एक लाख ८ हजार रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पकडला आहे. या कारवाईत तीन जणांना पकडण्यात आले असून अन्य एकाचा शोध घेण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शिवाजीनगरच्या हद्दीत एका बनावट पानटपरीवर गांजा विक्री केली जात होती. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलिस उपनिरीक्षक दत्तत्रय काळे यांच्यासह पथकाने धाड टाकली. या कारवाई शेख अनिस, शेख सलीम रा.नई आबादी शिवाजीनगर, शेख इमरान शेख अहेमद रा.तेहरानगर, व भुजंग निवृत्ती जोंधळे रा.आंबेडकरनगर नांदेड या तिघांना पकडले. त्यांच्याकडून एक लाख ८ हजार रुपये किंमतीची गांजा जप्त केला. तर पोलिस चौकशीत हा गांजा नई आबादी शिवाजीनगर येथे राहणा-या हमीद खान गौस खाने याने विक्रीसाठी दिला आहे,असे तिघांनी सांगितले. या प्रकरणी चार जणांविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.