विलासनगर : प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतक-यांचा हक्काचा कारखाना म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे पाहीले जाते. विकासरत्न विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व सहकार्याने मांजरा कारखान्याने सर्व गळीत हंगाम यशस्वी करुन त्या माध्यमातून सर्वाधिक ऊस दर देवून शेतक-यांच्या कष्टाचे मोल केले. गळीत हंगाम २०२३-२४ साठी गाळप क्षमतेचा विस्तार करुन शेतक-यांचा ऊस वेळेत गाळपासाठी कारखान्याकडे यावा यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा कार्यरत असून हा हंगामदेखील पंरपरेनुसार यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्नशील आहेत.
विद्यमान गळीत हंगाम केवळ २० दिवसात एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पुर्ण झाले असून दि. २६ नोव्हेंबरपर्यंत १०३७१० मे. टन गाळप झाले आहे.तसेच ५१०५०००(केडब्ल्यूएच) एवढी विज निर्मिती केली आहे. यासोबतच डिस्टलरी प्रकल्पातून ७७०४०१ एवढे अल्कोहोल निर्मिती केली आहे. इथेनॉल प्रकल्पातून २५६११८ लिटर इथेनॉलची निर्मिती केली आहे. एकंदरीतच साखर व अन्य उपपदार्थ निर्मिती मधून ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न सुरु असून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याकडे आपला ऊस गाळपासाठी देण्यात यावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी केले आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दुरदृष्टीतून मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना उभा राहिला. या कारखान्याने प्रारंभीपासूनच ऊस उत्पादक शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना आखल्या आणि त्या यशस्वीरित्या राबविल्या. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच सर्वाधिक ऊसदर दिला आहे. या कारखान्याने साखर कारखानदारीत आदर्श निर्माण केलेला आहे. या कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. शेतक-यांच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून आज विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते.