32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeपरभणीवयाची शंभरी पार केलेले १ हजार ३९२ मतदार

वयाची शंभरी पार केलेले १ हजार ३९२ मतदार

परभणी / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक विभागाने जाहीर केलेल्या अंतीम मतदार यादीत परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात वयाची शंभर वर्ष पार केलेल्या १ हजार ३९२ मतदारांचा समावेश असुन या मतदारांना निवडणुक मतदान करण्यासाठी विशेष सुविधा देवून त्यांचे मतदान करून घेण्यात येणार आहे.

 

परभणी जिल्ह्यातील १४ लाख ९३ हजार ३०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वयोवृध्द व दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणुक विभागाकडून विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहेत. ४० टक्यापेक्षा अधिक दिव्यांग असणा-या मतदारांसह वयाची ८५ वर्षे पुर्ण करणा-या मतदारांना आपले मतदान घरूनच करता येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधितांनी आपल्या नावाची नोंद बीएलओच्या माध्यमातून निवडणुक विभागाकडे करणे अनिवार्य आहे. या नंतर मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारांसाठी विशेष पथकाद्वारे घरी येवून मतदान घेण्यात येणार आहे.

वयाच्या ८४ वर्ष ओलांडणा-या मतदारांना निवडणुक आयोगाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदार जर मतदान केंद्रावर येवुन आपला हक्क बजावला तर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिंतूर विधानसभेत ४०९, पाथरीत २६५, परभणी २८७, गंगाखेड ४२१ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे. यात १२० वर्ष पार केलेले ४ मतदार, ११० ते ११९ वर्ष पुर्ण केलेले २, तर १०० ते १०९ वर्ष पुर्ण केलेले १३८६ मतदारांचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR