23.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंच्या १० मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री शिंदेंच्या १० मोठ्या घोषणा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला आजपासून सक्रियपणे सुरुवात झाली. कोल्हापूरमध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी महाविकास आघाडीववर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यातील महिला, शेतकरी, वृद्ध आणि तरुणांसाठी १० महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी दहा वचनांची घोषणा केली आहे. त्यात सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या १५०० रूपये दिले जातात, त्यात वाढ करून २१०० रूपये दर महिन्याला देण्याचे शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, राज्यातील पोलिस दलात २५ हजार महिलांची केली जाईल. शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी सन्मान योजनेच्या रक्कम मध्ये ही वाढ केली जाईल. सध्या १२ हजार दिले जातात, ते १५००० करण्यात येईल. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास या घोषणांची अंमलबजावणी केली जाईल असे शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणा
– लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला रु. १५०० वरुन रु. २१०० दिले जाणार. – राज्यातील पोलिस दलात २५,००० महिलांची भरती.
– शेतक-यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु. १२,००० वरुन रु. १५,००० मिळणार. तसेच एमएसपीवर २०% अनुदान दिले जाणार.
– प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.
– वृद्ध पेन्शन धारकांना रु. १५०० वरुन रु. २१०० मिळणार.

– राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवल्या जाणार.
– २५ लाख रोजगार निमिर्ती, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु. १०,००० विद्यावेतन मिळणार.
– राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार.
– अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला रु.१५,००० वेतन मिळणार.
– वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.
– सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९ ‘ १००० दिवसांच्या आत सादर केला जाणार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR