26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeनांदेडविष्णूपुरी धरणाचे १० गेट उघडले

विष्णूपुरी धरणाचे १० गेट उघडले

नांदेड : जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR