22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeउद्योगभारतातील १० कुबेर!

भारतातील १० कुबेर!

नवी दिल्ली : देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसोबत अनेक उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर Forbes 2024 World’s Billionaries List मध्ये या वर्षी १८६ भारतीयांची नावे आहेत. मागच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ही संख्या १६९ इतकी होती. या यादीत देशातील सर्वात मोठे दोन उद्योजक अदानी आणि अंबानी यांनी आपले स्थान राखले आहे.

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. टॉप-१० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी, शिव नाडर यांचा देखील समावेश आहे.

१) मुकेश अंबानी सध्या भारतात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इतकेच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते ९व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेट वर्थ ११७.५ बिलियन डॉलर आहे.

२) अदानी ग्रुपचे चेअरमन ८४.८ बिलियन डॉलर नेट वर्थचे मालक आहेत. तर भारतातील दुस-या क्रमांकाचे आणि जगातील १७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

३) HCL Technologies चे मालक शिव नाडर यांची नेट वर्थ ३६.७ बिलियन डॉलर आहे. ते भारतातील तिसरे आणि जगातील ४२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

४)  JSW Group च्या मालक असलेल्या सावित्री जिंदल अँड फॅमिली भारतातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेटवर्थ ३१.५ बिलियन डॉलर्स आहे. तर जगातील श्रीमंतांमध्ये त्या ५०व्या क्रमांकावर आहेत.

५) Sun PharmaCeutical Industries Ltd चे चेअरमन दिलीप सांघवी भारतातील ५वे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेट वर्थ २५.८ बिलियन डॉलर आहे. देशातील पहली फार्मा कंपनीचे मालक दिली जगातील ७१वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

६) सायरस पुनावाला भारताचे सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, Serum Institute Of India चे मालक सायरस यांची नेट वर्थ २१.८ बिलियन डॉलर आहे. तर ते जगातील ९० व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

७) कुशाल पाल सिंह  DLF लिमिटेडचे मालक आहेत आणि देशातील सातव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेट वर्थ २१.३ बिलियन डॉलर आहे तसेच ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ९०व्या क्रमांकावर आहेत.

८) कुमार मंगलम बिर्ला देशातील ८व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची नेट वर्थ १७.२ बिलियन डॉलर आहे. आदित्य बिरला ग्रुप चे मालक जगातील ९६वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

९) Dmart, Avenue Supermarts चे मालक राधाकृष्णन दमानी भारतातील नवव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांची नेट वर्थ १७.२ बिलियन डॉलर आहे. ते जगातील १०३वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

१०) १० व्या क्रमांकावर Arcelor Mittal चे मालक लक्ष्मी मितल आहेत. १६.४ बिलियन डॉलर नेट वर्थ असलेले मित्तल यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये १०७ वा क्रमांक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR