22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइम्रान खान यांना १० वर्षाचा तुरुंगवास

इम्रान खान यांना १० वर्षाचा तुरुंगवास

कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कारभार आटोपला आहे. सिफर प्रकरणात इम्रान खान यांना १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. इम्रान खान यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान यांना हा मोठा झटका बसला. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सिफर प्रकरणी सुनावणी करणा-या एका विशेष न्यायालयाने पीटीआयच्या या दोन्ही नेत्यांना प्रत्येकी दहा वर्षाची शिक्षा सुनावली. स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश अबूल हसनत जुल्करनैन यांनी कलम ३४२ अनुसार दोन आरोपींची साक्ष नोंदवल्यानंतर लगेच शिक्षेची घोषणा केली. माजी पंतप्रधान आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांच्याविरोधात पक्षकारांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आरोप सिद्ध होऊ शकतात, असं कोर्टाने म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण?

सिफरचं हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. अत्यंत गुप्त माहिती वैयक्तिक कारणासाठी वापरल्याचा इम्रान खान यांच्यावर आरोप आहे. सत्तेपासून बेदखल झाल्यानंतर इम्रान खान यांनी थेट अमेरिकेवर आरोप केला होता. मला सत्तेतून बेदखल करण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. वॉशिंग्टन येथील एका दुतावासाने मला एक गुप्त टेप पाठवली होती, असा दावाही इम्रान खान यांनी केला होता. इम्रान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या. त्यालाच सिफर असं म्हटलं जातं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR