22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपेपर अवघड गेल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पेपर अवघड गेल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

गडहिंग्लजमधील धक्कादायक घटना

पुणे : प्रतिनिधी
राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत. याच तणावातून अनेकदा विद्यार्थी नैराश्यात जातात. ब-याचदा ते टोकाचे पाऊल उचलतात, अशीच एक घटना कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधून समोर आली आहे. दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम लक्ष्मण कोळी (वय १६, रा. स्वामी कॉलनी), असे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

सत्यमचे वडील खासगी नोकरी करतात. लक्ष्मण कोळी यांचा सत्यम हा गडहिंग्लजमध्ये एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड जात होते. असे तो त्याच्या घरच्यांना सांगतही होता. याच तणावातून त्याने सोमवारी (१८ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास घेतला.

सत्यमने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केले. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमने जीवन संपवले आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्याला पेपर अवघड जात असल्याचे सत्यमने आईवडिलांना बोलून दाखवले होते. सत्यमची आई रविवारी बाहेरगावी गेली होती. त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला होता. सोमवारी सत्यमच्या घरी कोणीही नव्हते. तेव्हाच त्याने आत्महत्या केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR