नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून ११.११ लाख कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
तसेच, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सुविधांसाठीच्या निधीत ११ टक्के वाढ केली आहे. २०२४-२५ वर्षासाठी ११.११ लाख कोटींची घोषणा केली आहे. या निधीचा वापर देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केला जाऊ शकतो. लक्षद्वीपसह भारतातील सर्व किनारी भागांतील कनेक्टिव्हिटी, टूरिझम वाढवण्यासाठी इन्फ्रा आणि सुविधांनी युक्त असलेल्या प्रकल्पांची सुरुवात होईल.