27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्र१२.५० कोटींची जंगम मालमत्ता, ४ कोटींचे कर्ज!

१२.५० कोटींची जंगम मालमत्ता, ४ कोटींचे कर्ज!

माहिम : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आज माहिम विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या नावावर असलेल्या संपत्तीविषयी देखील माहिती दिली. अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

अमित ठाकरे यांच्यावर ४ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये इतकी रक्कम आहे.

अमित ठाकरे यांच्या ६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर शेअर्स ३ कोटी ९८ लाख रुपयांचे आहेत. तसेच त्यांची पोस्ट खात्यात २० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे ३ तोळे सोने आहेत. तसेच अमित ठाकरे यांनी आपला ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह असा व्यवसाय असल्याचे म्हटले आहे.

अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे १ कोटी ७२ लाख रुपयांची संपत्ती आहे. ५८ लाख ३८ हजार ५८७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मिताली ठाकरे यांच्या नावावर ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर त्यांनी म्युचूअल फंडमध्ये ५२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. मिताली ठाकरे यांच्याकडे ९ तोळे सोने आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर ७० हजार रुपये आहेत. तसेच मुलाच्या नावाच्या म्युच्यूअल फंडमध्ये ६० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मिताली यांची तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी आहे. सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR