22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रभुजबळांना धमकीचे सलग १२ मेसेज

भुजबळांना धमकीचे सलग १२ मेसेज

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रावादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी थेट विरोध केला आहे. या प्रकरणात मराठा समाज छनग भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झालेला असतानाच त्यांना अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहे. अशातच छगन भुजबळांना धमकीचे सलग १२ मेसेज पाठवण्यात आले असून आरोपी हा एमबीएचा विद्यार्थी असल्याचे उघड झाले आहे.

छगन भुजबळ यांना सलग १२ मेसेज पाठवून धमकावल्याप्रकरणी संभाजीनगरच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौदागर सातनाक नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वी देखील छावणी छावणी पोलिस ठाण्यात भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभुमीवर ही धमकी देण्यात आली असुन सदरील व्यक्ती बार्शी जि. सोलापुर येथील असुन एमबीएचे शिक्षण घेत असल्याचे समजले तसेच त्यानी फोनव्दारे माफी मागुन दिलगिरी व्यक्त करत असल्याचे पोलीस निरिक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR