25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयशेअर बाजारात १२०० अंकांची घसरण

शेअर बाजारात १२०० अंकांची घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आज सकाळी दमदार सुरुवात करणारा शेअर बाजार बजेट सादर झाल्यानंतर झरझर खाली उतरला. शेअर बाजार चढउताराच्या हिंदोळ्यावर होता. पण काही घोषणांचा मोठा फटका बाजाराला बसला.
दरम्यान,सकाळच्या सत्रात तेजीचे निशाण फडकवणा-या शेअर बाजाराने आता मान टाकली. जवळपास १२०० अंकांनी बाजारा घसरला. निफ्टीमध्ये २४१ अंकांची घसरण झाली. तर सेन्सेक्समध्ये १,०४३ अंकांची घसरण दिसून आली. लाँग टर्म कॅपिटल गेन करात वाढ झाल्याने बाजारात एकच हाहाकार झाला. हा कर आता १२.५० टक्के करण्यात आला आहे. तो पूर्वी १० टक्के इतका होता. त्यावर बाजाराने तात्काळ प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदवली. बाजाराच्या या घसरगुंडीने गुंतवणूकदारांच्या हाती निराशा लागली.

शेअर बाजाराची प्रतिक्रिया
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाषण सुरु करताच शेअर बाजार तेजीत आला. सकाळी ११ वाजता निफ्टीने हिरवे निशाण फडकवले तर सेन्सेक्स पण रुळावर आले. सकाळी ११.१० मिनिटांनी सेन्सेक्समध्ये १८० अंकांची उसळी दिसली. सेन्सेक्स ८०,६८२ अंकावर तर निफ्टी २४,५४६ अंकावर पोहचला. पण बजेट जस जसं पुढे सरकत गेले बाजाराच मूड बिघडला. बाजारात तेजीचे सत्र मंदावले. बाजार घसरणीकडे वळला. दुपारी १२ वाजेच्या आसपास सेन्सेक्समध्ये १९९ अंकांची घसरण आली. तर निफ्टी मध्ये ५२अंकांची घसरण दिसली.

भांडवली नफ्यावर जो कर आकारला जातो त्याला भांडवली लाभ कर म्हटल्या जाते. जेव्हा मालक, कंपन्यांमध्ये मालमत्ता हस्तांतरीत करण्यात येते. तेव्हा हा कर आकारण्यात येतो. जर सर्व भांडवली नफा कर आकारणीसाठी जबाबदार असेल तर दीर्घकालीन नफ्यासाठी कराचा दृष्टीकोन बदलतो. सरकार कॅपिटल गेन टॅक्स वाढविण्याची शक्यता पूर्वीपासूनच वर्तवण्यात येत होती. उद्योजकांच्या शिष्टमंडळाने हा कर कमी करण्याची वकिली केली होती. पण सरकारने हा कर वाढविण्याची घोषणा केली. हा कर आता १० टक्क्यांहून १२.५० टक्के करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण संपताच बाजाराने तीव्र प्रतिक्रिया दिली. बाजाराला मोठा झटका बसला. सेन्सेक्स १२३७ अंकांनी दणकावून आपटला. बाजार ७९,२६४ अंकावर घसरला. त्यानंतर ही त्यात घसरण दिसली. तर निफ्टीत थोड्यावेळापूर्वी ४०९ अंकांची घसरण दिसली. निफ्टी २४,०९९ अंकावर आला आहे. बाजाराला काही घोषणा रुचल्या नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातून काढता पाय घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR