22.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्र१३ सनदी अधिका-यांच्या बदल्या

१३ सनदी अधिका-यांच्या बदल्या

प्रवीण दराडे सहकार विभागाचे प्रधान सचिव राहुल कर्डीले नांदेडचे जिल्हाधिकारी

मुंबई : फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू असून आज आणखी १३ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रवीण दराडे यांची सहकार आणि पणन विभागाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांची बदली नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली राज्य कर सहआयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील २००२ च्या तुकडीचे अधिकारी असलेले पंकज कुमार यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी २ म्हणून करण्यात आली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव नितीन पाटील यांची बदली नवी मुंबईत कौशल्य विकास विभागाच्या आयुक्तपदी झाली आहे. राज्यपालांच्या सचिव या पदावर कार्यरत असलेल्या श्वेता सिंघल यांची बदली अमरावती विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागातील विशेष चौकशी अधिकारी-२ डॉ. प्रशांत नारनवरे यांची बदली राज्यपालांचे सचिव म्हणून झाली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांची बदली माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून झाली आहे. कौशल्य विकास विभागाचे आयुक्त पी. के. डांगे यांची बदली राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिवपदी करण्यात आली आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव एस. राममूर्ती यांची बदली राज्यपालांचे उपसचिव म्हणून झाली आहे. तर नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली राज्य कर सहआयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे. राज्य कर सहआयुक्त मिलिंदकुमार साळवे यांची बदली अल्पसंख्याक विकास आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे.

सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांची बदली नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून तर कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख यांची बदली व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या संचालकपदी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांची बदली यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा येथे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणून करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR