कर्करोगाची १३७ औषधी स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारने कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. कर्करोगाच्या १३७ औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. या नवीन किमती आज ९ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आल्या. एनपीपीएने या १३७ कर्करोगविरोधी औषधांसाठी व्यापार नफ्याची मर्यादा निश्चित केली. या किमती सुमारे ५० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. ५० हजार रुपये किमतीचे औषध आता फक्त २५ हजार रुपयांना उपलब्ध झाले आहे.

राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार आज ९ नोव्हेंबरपासून नवीन किमती लागू करण्यात आल्या. ८५ औषध कंपन्यांनी १३६४ कर्करोगविरोधी औषधांच्या सुधारित किमती जाहीर केल्या. या माहितीनुसार ६७९ ब्रँड्सच्या किमती ५० टक्क्यांहून अधिक कमी करण्यात आल्या आहेत तर काही औषधांच्या किमतीत तब्बल ९६.४५ टक्क्यांची कपात झाली. एका अंदाजानुसार १ लाख रुपये किमतीचे कर्करोगाचे औषध आता फक्त ४ हजार रुपयांना उपलब्ध होईल.

रुग्णांची वार्षिक बचत मोठी
औषधांच्या किमतीतील कपातीमुळे रुग्णांची वार्षिक अंदाजे ३,५४०.३८ कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे. कमी झालेल्या किमतीत औषधे खरेदी करण्याबाबत जागरूक राहण्यासाठी आणि आपल्या औषधांच्या यादीची तपासणी करण्यासाठी रुग्णांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. आजपासून रुग्ण ‘फार्मा सही दाम’ अ‍ॅप आणि एनपीपीएच्या वेबसाइटवर नवीन किमती तपासू शकतात.

एनपीपीएची हेल्पलाईन
जास्त किंमत आकारल्यास फार्मा जन समाधान पोर्टलवर किंवा एनपीपीए हेल्पलाइन १८००-१११-२५५ वर तक्रार करता येईल. एनपीपीएच्या या निर्णयामुळे महागडी औषधे खरेदी करण्यास भाग पडलेल्या कर्करोग रुग्णांना मोठा फायदा होईल. सरकारने यापूर्वी अनेक वेळा कर्करोगाच्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदार पळवापळवीचा आरोप!
07:46
Video thumbnail
Diwali 2026|नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दीपोत्सव | हजारो दिव्यांनी उजळला हुजूर साहिब गुरुद्वारा
01:08
Video thumbnail
Diwali 2026|दैनिक एकमत कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते पूजा
06:02

Latest news