चंडीगड : वृत्तसंस्था
मनी लाँड्रींगप्रकरणी संशयित आरोपीची सुमारे १४ तास चौकशी करणे हे काही शौर्याचे लक्षण नाही तर त्यामुळे संंबंधित माणसाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे ईडी अधिका-यांनी संशयित आरोपीची वाजवी कालावधीतच चौकशी केली पाहिजे, असे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने बजावले.
हरियाणा विधानसभा निवडणुकांतील सोनीपत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र पवार यांची ईडीने केलेली अटक रद्द केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. महावीरसिंह सिंधू यांनी हा निकाल दिला. त्यांचे ३७ पानांचे निकालपत्र बुधवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले.
१९ जुलै रोजी सुरेंद्र पवार यांची सकाळी ११ ते रात्री १.४० वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. अशा प्रकारे चौकशी करणे हे शौर्य नसून मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला फटकारले आहे.