इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या भीतीने अमेरिकेत गेलेले अफगाणी लोक आता पाकिस्तानात अडकले आहेत. कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांबाबत जारी केलेला कार्यकारी आदेश. या आदेशानुसार, पुढील ९० दिवस कोणत्याही देशातील निर्वासितांना येण्यास बंदी घातली आहे.
पाकिस्तानमध्ये १५ हजारांहून अधिक निर्वासित आहेत, ज्यांना बायडेन प्रशासनाने त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिली होती. २०२१ मध्ये अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकेने हजारो निर्वासितांना देशात जागा देण्याचे आश्वासन दिले होते. पण ट्रम्पच्या आदेशामुळे, या सर्व निर्वासितांचे भविष्य आता अंधारात आहे. त्यांना भीती आहे की जर ते परतले तर तालिबान सरकार त्यांना जिवंत सोडणार नाही. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेतल्यानंतर, १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने देशातील सत्ता काबीज केली.
आजकाल अफगाणिस्तानातील लोक इस्लामाबाद-रावळपिंडीमध्ये रस्त्यावर आहेत. ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने अफगाण निर्वासितांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की जे अफगाण निर्वासित तिस-या देशात स्थलांतरित होऊ शकत नाहीत त्यांना ३१ मार्च २०२५ नंतर पाकिस्तान सोडावे लागेल. पाकिस्तानच्या शाहबाज सरकारच्या या घोषणेवर निर्वासित गटांनी टीका केली आहे. ते म्हणतात की जर ते अफगाणिस्तानात परतले तर त्यांच्या जीवाला धोका आहे. ट्रम्प यांनी निर्णयाचा विचार करावा. अफगाण इव्हॅक ग्रुपचे संस्थापक शॉन म्हणतात की या संकटाचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.