21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयमतदानादरम्यान गैरप्रकारांच्या १५ हजार तक्रारी

मतदानादरम्यान गैरप्रकारांच्या १५ हजार तक्रारी

नवी दिल्ली : मध्य प्रदेश निवडणूक निकाल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका एका वकिलाने सरन्यायाधीशांना (सीजेआय) पाठवली आहे. मतदानादरम्यान गैरप्रकारांच्या १५ हजार तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे पत्र याचिकेत म्हटले आहे. इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड, सीसीटीव्ही बंद आणि इतर प्रकारांबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे देण्यात आल्या होत्या. या १५ हजार तक्रारी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरही उपलब्ध आहेत.

या तक्रारींवर कोणताही निर्णय न घेता निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रमाणपत्रे दिली असल्याचा आरोप पत्र याचिकेत करण्यात आला आहे. ही पत्र याचिका वकील नरेंद्र मिश्रा यांनी दाखल केली आहे. हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (ईव्हीएम) प्रश्न उपस्थित केले होते, मात्र काहींनी सांगितले की त्यांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत भारतीय जनता पक्षाने (भाजप) १६३ जागा जिंकून दोनतृतीयांश बहुमत मिळवले, तर काँग्रेसने ६६ जागावर विजय मिळवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR