22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरनीट प्रकरणातील आरोपींमध्ये १६ लाखांची उलाढाल

नीट प्रकरणातील आरोपींमध्ये १६ लाखांची उलाढाल

लातूर : विनोद उगीले
बहूचर्चित लातुरातील दाखल नीट प्रकरणातील आरोपींचा सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासात धागेदोरे व आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले असून त्यांच्यात १६ लाख रुपयांची उलाढाल झाली असून आरोपी संजय जाधव हा राजेश मोपलवार याच्या मुळे फरार आरोपी इरन्ना कोनगुलवार याच्या संपर्कात आला व येथूनच देशभरात खळबळ उडवून देणा-या नीट पेपर लीक प्रकरणाला सुरुवात झाल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे.

एटीएस नांदेड पथकाने या या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून या प्रकरणी लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सरकारी शाळेचे शिक्षक संजय जाधव व जलील पठाण, इरन्ना कोनगुलनार व गंगाधर नामक व्यक्ती विरोधात नवीन पेपर लीक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांकडून लाखो रुपये आरोपींनी उकळलेची चर्चा सुरू झाली.

आता या प्रकरणाचा सीबीआय तपास करीत असून या तपास सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला संजय जाधव हा लातूरातील राजेश मोपलवार नावाच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून सध्या फरार असलेल्या इरन्ना कोनगलवार या आरोपीच्या संपर्कात आला. संशयीत इरन्ना कोनगलवार याने नीट-यूजी २०२४ च्या परीक्षेत गुण वाढवण्याची तयारी काही व्यवस्था केल्याचे संजय जाधव यास समजले. या नंतर येथूनच या धक्कादायक प्रकरणाला खरी सुरुवात झाली. यानंतर संजय जाधव याने इरन्ना याच्याशी संर्पक वाढवला इरन्ना याने नीट-युजी २०२४ परीक्षेतील गुण वाढवण्यासाठी प्रती उमेदवार १० लाख रुपयाची मागणी केली, यानंतर संजय जाधव याने नीट परीक्षेत उमेदवारांचे गुण वाढवण्याबद्दल इरन्ना कोनगुलवार यास टोकन म्हणून ६ लाख रूपये दिले.

यानंतर संजय जाधव याने त्याच्या संपर्कात असलेल्या मुख्याधापक जलील पठाण याच्याशी या संदर्भात संपर्क साधला जालील पठाण याने संजय जाधव यास नीट-यूजी २०२४ परीक्षेतील १० उमेदवारांचे गुण वाढवण्यास सांगितले व संजय जाधव यास या १० उमेदवारीची प्रवेश पत्र व प्रति उमेदवार १ लाख रुपये प्रमाणे व इतर कागदपत्रासह १० लाख रुपये अडवांस दिल्याचे ही सीबीआय तपासात समोर आले आहे.

उमेदवार अन पालकांच्या चौकशीत आले समोर
संशयीत आरोपींच्या चौकशीत धागेदोरे सापडल्यानंतर तपास यंत्रणेने जवळपास १४ उमेदवार व त्यांच्या पालकांची चौकशी केली असता या चौकशी दरम्यान हे चित्र समोर आले आहे.

ईरन्ना कोनगुलवारचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला
लातूरमधील नीट प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी ईरन्ना कोनगुलवार याच्या अटकपुर्व जामीन अर्जावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकुन घेत न्यायालयाने आपला निर्णय राखुन ठेवला होता. शनिवारी न्यायालयाने निर्णय देताना ईरन्ना कोनगुलवारचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR