पिकअप दरीत कोसळून १८ मजूर ठार

कवर्धा : छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातील सुन्न करणारी घटना घडली आहे. कवर्धा जिल्ह्यातील बाहपानी परिसरात अपघाताची मोठी घटना घडली. या परिसरात पिकअप वाहन २० फूट दरीत कोसळल्याने १८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे छत्तीसगडसह संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात होती. पिकअपमधून प्रवास करणारे मजूर हे तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांची संख्या जवळपास ४० इतकी होती. हे सर्व मजूर तेंदुपत्ता तोडण्याचे काम आटोपून आपल्या घराकडे निघाले होते.

ते पिकअप गाडीतून घरी जात होते. पण याच पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. पिकअपचे नियंत्रण सुटल्याने ही पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या २० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तब्बल १८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण कवर्धा जिल्हा सुन्न झाला आहे.

सध्या तेंदुपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. हे सर्व मजूर तेंदुपान संकलन करून परत येत होते. याच दरम्यान संबंधित घटना घडली. कुकदुर पोलिस ठाणे अंतर्गत बाहपानी डोंगराळ भागातून पिकअप वाहन जात होते. याचदरम्याने चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला आणि ही गाडी दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आणि पिकअपखाली दबलेल्या मजुरांना कसे तरी बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताचा एक व्हीडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये कामगार पिकअपजवळ पडलेले दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कामगार आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिकअपमध्ये जंगलातून तेंदूपत्ता तोडून परतत होते. पिकअपमध्ये सुमारे ४० मजूर होते. दरम्यान, वाटेत पिकअपचे नियंत्रण सुटले आणि २० फूट खोल दरीत पडली. या अपघातात १८ मजुरांचा चिरडून मृत्यू झाला. तर २० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news