22 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्र३० बँक खात्यांमधील १७० कोटी गोठवले!

३० बँक खात्यांमधील १७० कोटी गोठवले!

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक;

मुंबई : वृत्तसंस्था
बनावट फॉरेक्स ट्रेडिंग आणि डिपॉझिट स्कीम चालवणा-या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी(१३ फेब्रुवारी) १७० कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या. ईडीच्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी दिल्ली, नोएडा, उत्तर प्रदेशातील शामली आणि हरियाणातील रोहतक येथे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. हा तपास ‘क्यूएफएक्स’ ट्रेड लिमिटेड आणि तिचे संचालक राजेंद्र सूद, विनीत कुमार आणि संतोष कुमार यांच्या विरोधात केला जात आहे. याशिवाय या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नवाब अली उर्फ ​​लविश चौधरीच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंगचा हा तपास सुरू करण्यात आला. ‘क्यूएफएक्स’ कंपनीवर बनावट फॉरेक्स ट्रेडिंग स्कीमद्वारे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने सांगितले की, ‘क्यूएफएक्स’ कंपनी आणि तिचे संचालक कोणत्याही नियमाशिवाय ठेव योजना चालवत होते आणि गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवत होते.

ईडीच्या माहितीनुसार, ‘क्यूएफएक्स’ ग्रुपचे एजंट मल्टी-लेव्हल मार्केटिंग (एमएलएम) योजनेअंतर्गत गुंतवणूक योजना चालवत होते. यासाठी वेबसाइट, मोबाईल अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या जाहिरातींचा वापर करण्यात आला. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. तसेच, अधिकाधिक गुंतवणूकदारांना या फसवणुकीत अडकवता यावे यासाठी भारत आणि दुबईमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे.

शेल कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार
एनपे बॉक्स प्रायव्हेट लिमिटेड, कॅप्टर मनी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टायगर डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या अनेक कंपन्यांचा वापर गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यासाठी करण्यात आल्याचे ईडीने उघड केले. या सर्व कंपन्या शेल (डमी) कंपन्या होत्या, ज्यांचा वापर ‘क्यूएफएक्स’/वायएफएक्स घोटाळ्यातील सूत्रधारांनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यासाठी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR