20.4 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयविमान अपघातात १७९ प्रवासी ठार; २ महिलांवर उपचार सुरू

विमान अपघातात १७९ प्रवासी ठार; २ महिलांवर उपचार सुरू

सेउल : वृत्तसंस्था
दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. बँकॉकमधून प्रवाशांना घेऊन आलेले विमान लँडिंग होताना अपघात झाला. यावेळी विमानाला लागलेल्या भीषण आगीत १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला.

धावपट्टीवरून जाऊन विमान भिंतीवर आदळल्यानंतर विमानाने पेट घेतला. दोन प्रवासी वगळता सर्व जण म्हणजे १७९ प्रवासी ठार झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. हा अपघात स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:०७ वाजता घडला. अपघातात दोन महिला वाचल्या आहेत. त्यामध्ये एक प्रवासी आणि एक क्रू मेंबर आहे. त्यांच्यावर मोक्पो येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचे नेमके कारण काय? बँकॉकहून परतणा-या विमानात सहा क्रू मेंबर्ससह एकूण १८१ प्रवासी होते. दोन थायलंडचे नागरिक वगळता बहुतांश प्रवासी कोरियन नागरिक होते.स्थानिक टीव्ही स्थानकांद्वारे प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये विमान लँडिंग गियरवर उतरताना जमिनीवर घसरल्याचे दिसते. स्फोट होण्यापूर्वी विमान काँक्रीटच्या भिंतीवर आदळले. त्यानंतर भीषण आगीत संपूर्णपणे भस्मसात झाले. लँडिंग गियरमध्ये बिघाड आणि शक्यतो पक्ष्यांच्या धडकेमुळे हा विमान अपघात झाला असावा. नेमके कारण शोधण्यासाठी घटनास्थळी चौकशी सुरू आहे.

थायलंडचे पंतप्रधान, पेटोंगटार्न शिनावात्रा यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत पोस्टद्वारे अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला त्वरित मदत करण्याचे आदेश दिल्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे.

विमान अपघातामधील मृतांची संख्या वाढून ८५ झाल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले. दक्षिण कोरियातील हा आजपर्यंतचा सर्वात भीषण विमान अपघात आहे. मृतामध्ये ३७ महिला आणि २५ पुरुष आहेत. नॅशनल फायर एजन्सीने सांगितले की, विमानाची आग जवळजवळ आटोक्यात आली आहे. परंतु अधिकारी अजूनही जेजू एअर प्रवासी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी ३२ फायर ट्रक आणि अनेक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

दक्षिण कोरियाच्या आपत्कालीन कार्यालयाच्या माहितीनुसार विमानतळावरील आग विझवण्यात आली. दक्षिण कोरियाच्या मुआन शहरातील विमानतळावरील जेजू एअर पॅसेंजर विमानाला लँडिंग होताना अचानक आग लागली. या दुर्घटनेतील काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. हे विमान सुमारे १८१ लोकांसह बँकॉकहून परतत होते.

दक्षिण कोरियाच्या आपत्कालीन कार्यालय आणि स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंग गियरमध्ये बिघाड असल्याने विमान धावपट्टीवरून घसरून कुंपणाला धडकले. त्यामुळे विमानतळावर रविवारी विमानाला आग लागली. स्थानिक टीव्ही माध्यमांनी विमान दुर्घटनेचे व्हिडिओ प्रसारित केले आहे. यात विमान लँडिंग होताना विमानाला भीषण आग लागल्याचं दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR