नवी दिल्ली : खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर येणारी १८ विमाने इतरत्र वळवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने वृतसंस्थेला सांगितले की, जयपूर, लखनौ, अहमदाबाद आणि अमृतसरच्या दिशेने उड्डाणे वळवण्यात आली आहेत. शनिवारी सकाळी ८.१० च्या सुमारास एक्सवरील पोस्टमध्ये दिल्ली विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे आवश्यक प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत विमानांच्या हालचालीत अडचणी निर्माण झाल्या होत्या.
दिल्लीत शनिवारी किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त होते. दिवसभर धुके राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली होती. दिल्लीत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विभागानुसार, राजधानीत सापेक्ष आर्द्रता शनिवारी सकाळी ८.३० वाजता १०० टक्के नोंदवली गेली आहे.
राजधानी दिल्लीत प्रदूषणामुळे आकाशात धुक्याची चादर पसरली आहे. राष्ट्रीय राजधानीत शनिवारी सकाळी हलके धुके पसरले आणि किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे सामान्यपेक्षा तीन अंश कमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमाल तापमान २५ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून हलके धुके राहील.