21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात १८ हजार कोटीच्या रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू

राज्यात १८ हजार कोटीच्या रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू

नवी दिल्ली : सर्व गर्दीच्या रेल्वेमार्गांवर पॅसेंजर कॉरिडॉर होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. सध्या राज्यात १८ हजार कोटीच्या रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्कालीन ‘यूपीए’ सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामांसाठी १,१७१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ‘एनडीए’ सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी १३०० टक्क्यांनी अधिक, म्हणजे १५,५५४ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

‘यूपीए’ सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दरवर्षी ५८ किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग तयार केले जात होते. तर आमच्या सरकारच्या कार्यकाळात ही संख्या वर्षाला ३९६ किलोमीटरवर गेली आहे, असे सांगून वैष्णव पुढे म्हणाले, रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणाचा विचार करता महाराष्ट्रातील ९८ टक्के मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून विद्युतीकरण लवकरच पूर्ण होणार आहे.

१२६ स्थानकांचा विकास अमृत स्थानके म्हणून केला जात आहे. गत १० वर्षांच्या काळात ८१६ उड्डाणपूल आणि अंडरपास तयार करण्यात आले आहेत. तर १३०० स्थानकांचा पूर्णपणे पुनर्विकास केला जात आहे.

महाराष्ट्रात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून या राज्यातील रेल्वेच्या योजनांना चांगली गती मिळाली, असे सांगत मंत्री अश्­िव­नी वैष्णव यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. आधीच्या सरकारच्या काळातील बंद पडलेले प्रकल्पही सुरु झाले आहेत, असे सांगून रेल्वेमंत्री पुढे म्हणाले, एक स्थानक-एक स्टॉल योजनेअंतर्गत ११७ स्टॉल्स महाराष्ट्रातील स्थानकांवर चालविले जात आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. कवच योजना, ऑप्टिकल फायबरचे जाळे तसेच टेलिकॉम टॉवर बसवण्याची योजना देखील प्रगतीपथावर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR