22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयनागालँडमध्ये १९० कोटींचे ड्रग्ज जप्त

नागालँडमध्ये १९० कोटींचे ड्रग्ज जप्त

कोहिमा : ईशान्य भारतातील नागालँड राज्यात या वर्षात आतापर्यंत एकूण ४५६ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच १९० कोटी रुपयांचे अवैध ड्रग्ज जप्त करण्यात आले. राज्याचे पोलीस महासंचालक रुपिन शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेत डीजीपी रुचिन यांनी सांगितले की, इतक्या लोकांना अटक आणि ड्रग्ज जप्तीच्या प्रकरणांमध्ये एकूण ३१८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. जप्त केलेल्या अवैध अमली पदार्थांमध्ये ११७१ किलो गांजा, ३२ किलो अफू, २६.६३ किलो हेरॉईन आणि ५.४६ किलो ब्राऊन शुगरचा समावेश आहे.

डीजीपी रुपिन यांनी सांगितले की, कोहिमा जिल्ह्यातील जुब्जा पोलिस स्टेशन परिसरातून १२ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यानंतर नागालँडशिवाय मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. डीजीपी रुपिन शर्मा पुढे म्हणाले की, नागालँडला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या आमच्या उद्देशाचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, नागालँडला २०४७ पर्यंत अंमली पदार्थमुक्त राष्ट्र बनवण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने आम्ही देखील वचनबद्ध आहोत. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR