21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवरत्नापूर येथे ट्रकमधून २.११ लाखांचे कपडे लंपास

रत्नापूर येथे ट्रकमधून २.११ लाखांचे कपडे लंपास

धाराशिव : प्रतिनिधी
सोलापूर – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर येरमाळा ते पारडी फाटा दरम्यान चालत्या ट्रक, कंटेनर मधून साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. ट्रक चालकाला अडवून मारहाण करून हे प्रकार होत आहेत. दोन दिवसापुर्वी तर कंटेनर मधील नवीन ७ दुचाकी दरोडेखोरांनी लंपास केल्या. कळंब तालुक्यातील रत्नापूर गावाजवळ हॉटेलवर उभा केलेल्या ट्रकमधील २ लाख ११ हजाराच्या साड्या, शर्टचे बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाणे येथे ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर येथील ट्रकचालक दिनेश शिवराज गवशेट्टी हे ३० ऑक्टोबर रोजी ट्रक घेऊन जात होते. त्यांनी त्यांचा ट्रक रत्नापूर शिवारातील बांगर हॉटेल जवळ उभा केला होता. ट्रकवरील ताडपत्री फाडून चोरट्यांनी अंदाजे २ लाख ११ हजार ८९ रूपये किंमतीच्या सिल्क साडयाचे १११ बॉक्स, शर्टाचे १२८ बॉक्स व लेडीज ब्रा बॉक्स मधील १४ नग असे साहित्य लंपास केले. या प्रकरणी दिनेश गवशेट्टी यांनी दि. ७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR