परभणी : परभणी ते जिंतूर या महामार्गावरील झरी शिवारातील पेट्रोल पंपाजवळ कारने दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलवरील बाप-लेकीचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५:०० च्या सुमारास घडली.
एम एच १२ एन बी ३९०३ या क्रमांकाची स्विप्ट डिझायर कार व एम. एच. ३७ एजे १६४४ या क्रमांकाची मोटारसायकल या दोन वाहनात जोरदार धडक झाली. त्या धडकेत मोटारसायकलवरील किरण चौधरी(४०) यांचा पाय निखळला तर मोटारसायकल वरील छोटी मुलगी कृष्णाई किरण चौधरी(१३) हिच्या पायास जबरदस्त मार लागला.
दरम्यान प्रत्यक्षदर्शनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. मात्र या अपघातात दोन्ही बाप-लेकीचा मृत्यु झाल्याची माहीती मिळाली आहे.