25.8 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्र२ अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून हत्या

२ अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून हत्या

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, ५४ वर्षीय नराधम अटकेत

पुणे : प्रतिनिधी
दोन अल्पवयीन बहि­णींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी एका ५४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील एका शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या घटनेत ८ आणि ९ वर्षीय दोन बहि­णींची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्यावरून संतापाची लाट उसळली आहे.

आरोपी हा एका स्थानिक हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि पीडित मुलींच्या शेजारीच राहतो, तसेच तो मुलींच्या कुटुंबियांनादेखील ओळखत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या दोन मुलींचे मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या घराजवळील एका खोलीत पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणा-या ड्रममध्ये आढळून आले. बुधवारी सकाळी घराजवळ खेळत असलेल्या मुली सापडत नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेशनमध्ये दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीचे वडील सफाई कर्मचारी म्हणून काम करतात तर आई मजूर आहे. या प्रकरणी बाललैंगिक गुन्हे प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ अटक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR