23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeमहाराष्ट्रट्रेलरवर कार आदळून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

ट्रेलरवर कार आदळून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पिंपरी : आयशर ट्रेलरवर कार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. गुरुवारी (दि. १८) सकाळी पावणेसहाच्या सुमारास देहूरोड-कात्रज बा वळण महामार्गावर ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

दिव्यराजसिंग राठोड (वय २२, रा. राजस्थान), सिद्धांत आनंद (२३, रा. झारखंड) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हर्ष मिश्रा (२१, रा. राजस्थान), निहार तांबोळी (वय २०, रा. ताथवडे) हे दोघे जखमी झाले आहेत. ट्रेलर चालक मनीष कुमार सूरज मणिपाल (वय ३९, रा. वडाळा, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बीबीए अभ्यासक्रम शिकत असलेले चार विद्यार्थी बुधवारी लोणावळ्याला फिरायला गेले होते.

परत येताना गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास देहुरोड-कात्रज बा वळण महामार्गावरून जात होते. त्यावेळी संशयित मनीष कुमार याने त्याच्या ताब्यातील आयशर ट्रेलर रस्त्यावरील पांढ-या पट्ट्यांमुळे अचानक थांबवला. त्यावेळी पाठीमागून आलेली कार आयशर ट्रेलरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील सिद्धांत आणि दिव्यराज या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले हर्ष व निहार हे दोनजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सिद्धांत आणि दिव्यराज यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR