30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्र्यांना धमकी देणा-या २ संशयितांना अटक

उपमुख्यमंत्र्यांना धमकी देणा-या २ संशयितांना अटक

शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची दिली होती धमकी

बुलडाणा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारे ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगेश अच्युतराव वायल (३५) आणि अभय गजानन शिंगाणे (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते दोघेही देवळगाव मही, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहेत. त्यांना देवळगाव, जिल्हा बुलढाणा येथून अटक करण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR