28.7 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्र  मराठा आरक्षणासाठी २ तरुणांची आत्महत्या

  मराठा आरक्षणासाठी २ तरुणांची आत्महत्या

जालना : प्रतिनिधी
सगेसोयरे आणि हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी करत अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. सरकारने अद्यापही कोणतीही मागणी मान्य केलेली नाही. यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून नैराश्यातून काही तरुण आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल उचलत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या जरांगेंच्या उपोषणाचा आज सोमवारी सातवा दिवस आहे. मराठवाड्यात आणखी दोन तरुणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि जालना जिल्ह्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे. साईनाथ सखाराम पडोळे (वय २६) आणि दादाराव रंगनाथ काकडे (वय ४०) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ हिंगोलीतील वसमत तालुक्यातील मुडी येथील रहिवासी होता. सोमवारी पहाटे अडीज वाजेच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी साईनाथने एक चिठ्ठी लिहून ठेवली. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत. याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. जालना जिल्ह्यातील वरुडी येथील दादाराव रंगनाथ काकडे (वय ४०) यांनी देखील आपल्या राहत्या घरी रविवारी रात्री विष प्राण करून आत्महत्या केली

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR