19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरशालेय पोषण आहारचा २० कोटींचा निधी रखडला

शालेय पोषण आहारचा २० कोटींचा निधी रखडला

सोलापूर : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे पोषण आहाराचा २० कोटींचा निधी न आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

जिल्ह्यातील चार लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यामध्ये खिचडी, केळी, प्राऊड, खीर आदी प्रकारचे पोषण विद्यार्थ्यांना दररोज दिला जात आहे. मात्र यासाठी येणारे अनुदान लाडकी बहिण योजनेमुळे थकल्याने जिल्ह्यातील ब-याच शाळेतील पोषण आहार गायब होत असल्याची माहिती समारे येत आहेत. त्यामुळे शासनाने पोषण आहाराचा निधी वेळेवर देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील इंधन भाजीपाल्याचे दोन कोटी ५० लाख, केंद्रीय स्वयंपाक गृहाचे तीन कोटी ८० लाख, धान्याचे १० कोटी, स्वयंपाक मदतनीस यांचे चार कोटी असे एकूण २० कोटी रुपयांचे अनुदान थकले आहेत.

अनुदान मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठविले. प्रस्ताव पाठवून एक महिना लोटला तरीही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभाग अनुदानाची वाट पाहत आहे.प्रधानमंत्री पोषण योजना अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ पर्यंत देण्यात आलेल्या पोषण आहाराची माहिती २० जानेवारीपर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठवावे, असे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मुख्याध्यापकांना काढले आहे. त्यानंतर माहिती पाठविणा-या शाळांना अनुदान मिळणार नसल्याचे सांगितले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR