नांदेड : वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत न्यायालयाच्या पाठीमागे गांजा विक्रीच्या उद्देशाने आणलेल्या आहे का इसमाकडून जवळपास २० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी केले आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
वजीराबाद ठाण्याच्या हद्दीत जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील परिसरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सोमवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक व त्यांच्या सहका-यांनी न्यायालयाच्या पाठीमागील भागात चौकशी करून विक्रीच्या उद्देशाने आणलेला २० किलो गांजा पकडून या प्रकरणात एका जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.