21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्र२० मध्यम प्रकल्प गेले जोत्याखाली

२० मध्यम प्रकल्प गेले जोत्याखाली

गेल्यावर्षीच्या तुलनेत ५१ टक्के कमी पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ४७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला या प्रकल्पांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ५१ टक्के कमी पाणीसाठा आहे. तर दोन मध्यम प्रकल्प आताच कोरडे पडले असून २५ मध्यम प्रकल्पात जोत्याच्या खाली पाणी आहे. गेल्यावर्षी ८ मोठे प्रकल्प १०० टक्के भरलेले होते मात्र यंदा त्यात समाधानकारक साठा नाही परिणामी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न चिंताजनक होण्याची स्थिती अटळ आहे.

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमधील शुक्रवार (ता.२४) च्या अहवालानुसार ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये २४४२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ४७ टक्के इतके आहे. गेल्यावर्षी याच तारखेला या प्रकल्पांमध्ये ५०६७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता हे प्रमाण ९८ टक्के होते मात्र यंदा पावसाने दगा दिल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २६२५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ५१ टक्के कमी साठा आहे. गेल्यावर्षी २४ नोव्हेंबर रोजी या ११ मोठ्या प्रकल्पांपैकी तब्बल ८ प्रकल्प १०० टक्के भरलेले होते, मात्र यंदा याच धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. आता नोव्हेंबर सुरू असून सध्या ही अवस्था आहे तर भर उन्हाळ्यात पाण्याची स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.
सहा मध्यम प्रकल्प जोत्याखाली

विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये असलेल्या ७५ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ ११ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यांत प्रत्येकी एक प्रकल्प कोरडा आहे तर विभागात २० प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेलेले आहे. यामध्ये सात धाराशिव जिल्ह्यांतील, पाच बीड, जालना, लातूर प्रत्येकी तीन, छत्रपती संभाजीनगर दोन तर नांदेड जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे. २५ प्रकल्पांत २५ टक्के, १३ मध्ये २५ ते ५० आणि चार प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

३१ लघुप्रकल्प कोरडे
मराठवाड्यातील तब्बल १८३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ३१ प्रकल्प कोरडे झाले आहेत तर सातमध्ये पाणी जोत्याखाली आहे. १८३ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. ४९ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के तर १४९ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जलसाठा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR