20.4 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील २२ लाख २२ हजार मतदार १८-१९ वयोगटातील

राज्यातील २२ लाख २२ हजार मतदार १८-१९ वयोगटातील

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांनी नोंदणी केली. यात १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर, वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यातील एकूण मतदारांमध्ये पाच कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यातील १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ मतदारांमध्ये पुरुष मतदार १२ लाख ९१ हजार ८४७, ९ लाख ३० हजार ७०४ महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३ इतकी आहे. तसेच २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२, महिला मतदार ८६ लाख ८० हजार १९९ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २३९४ इतकी आहे. तर ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११ लाख २१ हजार ५७७, महिला मतदार १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९ इतकी आहे.

विशेष वयोगटामध्ये ८५ ते १५० वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदारांमध्ये ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष, ६ लाख ९८ हजार ०२२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार आहेत. तर १०० ते १५० वयोगटामधील एकूण ४७ हजार ३९२ मतदारांमध्ये २१ हजार ९१ पुरुष, २६ हजार २९९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स) एकूण १ लाख १६ हजार १७० मतदारांमध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष तर ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.

१ लाख १८६ मतदान केंद्र
राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR