35.1 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeसोलापूरकार्तिकी वारीनिमित्त विठुमाऊलीचे २४ तास दर्शन

कार्तिकी वारीनिमित्त विठुमाऊलीचे २४ तास दर्शन

पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येणा-या जास्तीत जास्त वारकरी भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी यात्रा काळात देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे ठेवले जाते. देवाच्या राजोपचारामुळे भाविकांची दर्शन रांग थांबू नये यासाठी राजोपचारही बंद केले जातात. या प्रथेप्रमाणे काल (गुरुवार) पासून भाविकांना विठुरायाचे २४ तास दर्शन सुरु करण्यात आले. ३० नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाणार आहे.

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या वेळी लाखो भाविक पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत जाते. भाविकांना तासन्तास रांगेत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन या दोन्ही यात्रांच्या वेळी जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचा पलंग काढून ठेवला जातो आणि देवाच्या पाठीशी लोड ठेवला जातो. या प्ररंपरेप्रमाणे काल देवाच्या शेजघरातील पलंग काढून देवाच्या पाठीशी लोड तर रुक्मिणीच्या पाठीशी तक्क्या ठेवण्यात आला. मंदिर आजपासून ३० नोव्हेंबरपर्यंत अहोरात्र उघडे ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR