सोलापूर : गेल्या काही महिण्यांपासून कमी घंटागाड्यांमुळे सोलापुरातील कचरा उचलण्याची व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नवीन २५ घंटागाड्यांचे दस-याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूरच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येला उपाय म्हणून नवीन ३८ घंटा गाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी २५ घंटागाड्यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उर्वरित तेरा घंटागाड्या ही लवकरच सेवेत रुजू होतील अशी माहिती देण्यात आली. नवीन ३८ गाड्यांमुळे आता सोलापुरातील कचरा उचलण्यासाठी १८६ गाड्या रस्त्यावर धावतील. या १८० गाड्यांमध्ये मक्तेदाराच्या २६ गाड्या धरल्या तर साधारण २०६ गाड्या सध्या शहरातील कचरा उचलण्याचे काम करतील. नगरातील प्रत्येक मार्गावर आता स्वतंत्र घंटागाडी असेल अशी माहिती महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली.