29.2 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाकच्या २५ सैनिकांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाकच्या २५ सैनिकांचा मृत्यू

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (आयएसपीआर) सांगितले की, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३ सैनिकांचा दरबनमध्ये तर दोन जवानांचा कुलाचीमध्ये मृत्यू झाला आहे. आयएसपीआरने म्हटले आहे की, १२ डिसेंबरच्या पहाटे दरबंदमध्ये सहा अतिरेक्यांनी सुरक्षा दलांच्या चौकीवर हल्ला केला. सुरक्षा दलांनी आतमध्ये घुसण्याचा अतिरेक्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोस्टमध्ये घुसवले. यानंतर आत्मघाती स्फोट झाला. यानंतर इमारत कोसळली.

या हल्ल्यात २३ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे आयएसपीआरने म्हटले आहे. तर सहा अतिरेकी मारले गेले. या भागात शोधमोहीम सुरू आहे. आयएसपीआरने असेही म्हटले आहे की, डेरा इस्माईल खान जिल्ह्यात ११ आणि १२ डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या वेगवेगळ्या कारवाईत २७ दहशतवादी मारले गेले. गुप्त माहितीच्या आधारे दरझिंडा येथे करण्यात आलेल्या कारवाईत १७ अतिरेकी मारले गेले. कुलाची येथे कारवाई करण्यात आली असून त्यात चार अतिरेकी मारले गेले आहेत. येथे दोन्ही बाजूंच्या गोळीबारात दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

जबाबदारी स्वीकारली
तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान नावाच्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने पाकिस्तानमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत. तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तानचे प्रवक्ता मुल्ला कासिम याने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला होता. सध्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR