26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeअंतरराष्ट्रीय२६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अ. रहमान मक्कीचा मृत्यू

२६/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज अ. रहमान मक्कीचा मृत्यू

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

इस्लामाबाद : भारतीय लष्कराचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की यांचा पाकिस्तानमध्ये शुक्रवारी (दि.२७) मृत्यू झाला. मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) उपप्रमुख आणि हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. वृत्तानुसार, मक्कीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

२०२३ मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केले होते, ज्या अंतर्गत त्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. याशिवाय मक्कीवर प्रवास आणि शस्त्रास्त्रांवर निर्बंध लादण्यात आले होते. हाफिज अब्दुल रहमान मक्की यांचे शुक्रवारी (दि.२७) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो मुंबई हल्ल्याचा सूत्रधार, दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आणि प्रतिबंधित जमात-उद-दावाचा उपप्रमुख होता. जमात-उद-दावाच्या म्हणण्यानुसार, अब्दुल रहमान मक्की हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उच्च मधुमेहावर उपचार सुरू होते. जेयूडीच्या एका अधिका-याने सांगितले की, मक्कीला आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा
जेयूडी प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा मक्की याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने २०२० मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात ६ महिन्यांची शिक्षा सुनावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. पाकिस्तान मुताहिदा मुस्लिम लीगने एका निवेदनात म्हटले होते की, मक्की हा कट्टरपंथी इस्लामवादी पाकिस्तानी विचारसरणीचे समर्थक होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR