२६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी थेट संबंध

नवी दिल्ली : पटेल कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात सहभागी एजंट्सविरोधातील मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान ईडीने मानवी तस्करीचे आंतरराष्ट्रीय सिंडीकेट उघड केले आहे. ज्यामध्ये कॅनडामधील किमान २६० महाविद्यालयांचा समावेश आहे. ही महाविद्यालयांनी कॅनडामार्गे अमेरिकेत जाणा-या बेकायदेशीर स्थलांतरितांना विद्यार्थी व्हिसा जारी केला असल्याची माहिती गुरूवार दि. २६ डिसेंबर रोजी ईडीने जारी केली आहे. सध्या अशा महाविद्यालयांच्या व्यवहारांची तसेच त्यांनी स्थलांतरितांकडून किती पैसे घेतले यासंबंधी तपास सुरू आहे.

अमेरिका-कॅनडा सीमेवर सुमारे तीन वर्षांपूर्वी, १९ जानेवारी २०२२ रोजी एक गुजराती कुटुंब ज्यामध्ये जगदीश पटेल (वय ३९), पत्नी वैशाली (३५), मुलगी (११) आणि मुलगा (३) यांचा थंडीत गारठून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करताना मॅनिटोबा येथे त्यांचा मृत्यू झाला होता. मानवी तस्करी करणा-यांनी या कुटुंबाला उणे ३७ अंश सेल्सिअस तापमानात हिमवादळत सोडून दिले होते.

अमेरिकेत जाण्यासाठी ‘डंकी’ पद्धतीने जाण्यापेक्षा विद्यार्थी व्हिसा काढणे सोयीस्कर वाटणा-यांनी प्रत्येकी ५०-५० लाख देऊन तो मिळवल्याचे सांगितले जात आहे. अशा बेकायदेशीर स्थलांतरांकडून कॅनडामधील महाविद्यालयांनी नेमके किती पैसे घेतले याचादेखील शोध घेतला जात आहे. दरम्यान ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तपासात असे समोर आले आहे की, भारतीयांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवण्यासाठी, एजंटांनी कॅनडातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये त्यांच्या प्रवेशाची व्यवस्था केली आणि त्यांना विद्यार्थी व्हिसावर तेथे पाठवले. एकदा कॅनडामध्ये पोहचल्यावर ते महाविद्यालयात रूजू होण्याऐवजी त्यांनी बेकायदेशीरपणे यूएस-कॅनडा सीमा ओलांडली. तपासादरम्यान, ईडीने कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. याबरोबरच आरोपींच्या बँक खात्यातील १९ लाख रुपयेही जप्त केले आहेत. २०२२ मध्ये जगदीश पटेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रवासाची व्यवस्था करणारा एजंट भावेश पटेल याच्याविरुद्ध अहमदाबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याचा तपास ईडीकडून केला जात आहे.

‘ईडी’ची आठ ठिकाणी छापेमारी
ईडीने १० डिसेंबर आणि १९ डिसेंबर रोडी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील आठ ठिकाणी कॅनडामधील महाविद्यालयांद्वारे बेकायदेशीर स्थलांतरितांना पाठवणा-या एजंट्सच्या ठिकाणांवर छापे टाकले. या दरम्यान ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. ईडीने बुधवारी सांगले की या तपासादरम्यान असे दिसून आले की, मुंबई आणि नागपूर येथील फक्त दोन एजंट्सनी दरवर्षी जवळपास ३५,००० बेकायदेशीर स्थलांतरींना परदेशात पाठवले आहे.

देशभरात ३५०० एजंट
या रॅकेटमध्ये गुजरातमधील सुमारे १,७०० एजंट आणि भारतभरात सुमारे ३,५०० जण सहभागी असल्याचेही तपासात आढळून आले आहे. ईडीचा अंदाज आहे की ८०० हून अधिक एजंट त्यांच्यावर अनेक यंत्रणांनी कारवाई करूनही अजूनही सक्रिय आहेत. मुंबई आणि नागपूर येथील किमान दोन एजंट असे सापडले आहेत, ज्यांनी कमिशनच्या आधारावर विद्यार्थी पाठवण्यासंबंधी परदेशातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांशी करार केलेले आहेत. पुढे बेकायदेशीर स्थलांतर करणा-यांच्या स्टुडंट व्हिसासाठी या एजंट्सकडून आवश्यक कागदपत्रे तयार केली जात असत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news