28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरजिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत २६० दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत २६० दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग

लातूर : प्रतिनिधी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने हरंगुळ येथील संवेदना प्रकल्पात जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील ४४ शाळांमधील सुमारे २६० दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित कलाविष्कार सादर केला. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विशेष शाळा, कार्यशाळा व मतीमंद बालगृह यांच्या संयुक्त्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते झाले.

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जीवन विकास प्रतिष्ठानचे संचालक संजय निलेगावकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, संवेदना संस्थेचे कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर यावेळी उपस्थित होते. दिव्यांगाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त्त देवसटवार यांनी सांगितले शासन दिव्यांगाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित असून त्याचा लाभ दिव्यांगांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी लेझीम, समूह नृत्य, स्त्रोत, गीत गायन, वैयक्तिक नृत्यू, मुकनाट्य, एकपात्री नाट्यप्रयोग आदी कलाविष्कार सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४४ शाळांमधील मूकबधीर, अस्थिव्यंग, अंध, गतिमंद विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी सुरदास व हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केले. सूत्रसंचालन बंकट पवार, सिंधू इंगळे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR